खेड : घरडा इन्स्टिट्यूटमध्ये पुरुषोत्तम अटकरे यांचे चर्चासत्र

Sep 13, 2024 - 10:35
Sep 13, 2024 - 12:37
 0
खेड : घरडा इन्स्टिट्यूटमध्ये पुरुषोत्तम अटकरे यांचे  चर्चासत्र

चिपळूण : खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीमध्ये नुकतेच मुंबई येथील प्लॉसिअस डिझाईन प्रायव्हेट लि. चे मालक पुरुषोत्तम अटकरे यांच्याकडून सिव्हिल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कनेक्शन इन स्टॉल अँड आरसीसी स्ट्रक्चरल फिल्ड परस्पेकटिव्ह' या विषयावर चर्चासत्र झाले.

श्री. अटकरे यांनी स्ट्रक्चरल फिल्डमध्ये येणारी आव्हाने, स्ट्रक्चरल ऑडिटची गरज, तसेच नवनवीन संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक बांधकामे कशी वाढावावीत यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने प्लॉसिअस डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट घरडा इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केले. या वेळी घरडा इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, सिव्हिल डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. वाय. आर. कुलकर्णी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:00 PM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow