चिपळूण : खेर्डीच्या उपसरपंचपदी सचिन मोहिते यांची बिनविरोध निवड

Sep 14, 2024 - 10:28
Sep 14, 2024 - 12:32
 0
चिपळूण : खेर्डीच्या उपसरपंचपदी सचिन मोहिते यांची बिनविरोध निवड

चिपळूण : तालुक्यात सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन राजाराम मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुप्रिया उतेकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. सरपंच, पॅनेल प्रमुख आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेत गावात विविध उपक्रम राबवण्याचा विश्वास नवनिर्वाचीत उसरपंच मोहिते यांनी व्यक्त केला. श्री सुकाई परिवर्तन पॅनेलचे प्रमुख जयंद्रथ खताते यांच्या उपस्थितीत मोहिते यांचा पदग्रहण सोहळा झाला. यावेळी शशिभाऊ कासार, सुनील मेस्त्री, माजी सरपंच रवी फाळके, वृंदा दाते, अपर्णा दाते, प्रकाश पाथरवट, ग्रामविकास अधिकारी विकास देसाई आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow