मालगुंड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दीपक दुर्गवळी यांची बिनविरोध निवड

Sep 14, 2024 - 10:09
Sep 14, 2024 - 15:11
 0
मालगुंड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दीपक दुर्गवळी यांची बिनविरोध निवड

गणपतीपुळे : मालगुंड गावचे माजी सरपंच दीपक दुर्गवळी यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मालगुंड ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा बुधवारी मालगुंड ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच संतोष चौगुले, ग्रामसेवक प्रवीण चौधरी उपस्थित होते. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:37 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow