खेड खोपी मार्गावर एसटी बसला अपघात

Sep 14, 2024 - 15:09
 0
खेड खोपी मार्गावर एसटी बसला अपघात

खेड : खेड खोपी मार्गावर खेड बिजघर एसटी बसचा अपघात झाला. बसचा अचानक स्प्रिंग रॉड तुटल्यामुळे बस मागील बाजूने शेतात पलटी होता होता वाचली. एसटी बस मधील ३० ते ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. खेड खोपी मार्गावर वेरळ या ठिकाणी या बसचा अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली होती.

बस क्र एम एच ४० एन ९७४९ या क्रमांकाची एसटी बस खेड ते बिजघर अशी जात असताना वेरळ या ठिकाणी एसटी चा रॉड तुटल्यामुळे एसटी बस पाठीमागून काही फूट खोल अंतरावर असणाऱ्या शेतामध्ये घसरली. सुदैवाने एसटी बस पलटी होताना वाचली. या एसटी बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी प्रवास करत होते. ही घटना घडल्यानंतर खेड खोपी मार्गावर तब्बल ४ तास वाहतूक कोंडी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow