प्रवाशाच्या दागिन्यांवर चोरट्याने मारला डल्ला

Sep 14, 2024 - 11:06
Sep 14, 2024 - 16:09
 0
प्रवाशाच्या दागिन्यांवर चोरट्याने मारला डल्ला

संगमेश्वर : मुंबईहून गावाला खासगी ट्रॅव्हल्सने येत असलेल्या प्रवाशाचे सोन्याचे दागिने प्रवासादरम्यान चोरट्याने चोरल्याची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत सौरभ सुभाष चाळकेने फिर्याद दिली आहे. सौरभ सुभाष चाळके (रा. डिंगणी चाळकेवाडी) हा मंगळवारी रात्री खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईहून संगमेश्वरकडे येत होता. त्याच्या बॅगमध्ये मंगळसूत्र, अंगठी तसेच कानातले सोन्याचे दागिने होते. त्याची किंमत २ लाख ७० हजार रुपये आहे. प्रवास करत असताना बॅगेमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने सावर्डे येथे पाहिले असता त्याना  ते आढळून आले नाहीत. त्यानंतर आरवली या ठिकाणी येऊन सदरची बाब पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:32 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow