राजापूर : दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी सोलगाव शाळेत लॉकरची व्यवस्था

Sep 14, 2024 - 16:21
 0
राजापूर : दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी सोलगाव शाळेत लॉकरची व्यवस्था

राजापूर : पाठीवरील दप्तरांच्या ओझ्याने मुलांना विविध शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. याच गोष्टीला तालुक्यातील सोलगाव येथील शाळा नं. २ ने फाटा दिला आहे. मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा भार कमी करण्यासाठी 'दप्तरमुक्त शाळा' आणि मनावरील ओझे कमी करण्यासाठी 'आनंदमयी शिक्षण' हा नवोपक्रम या शाळेने सुरू केला. मुलांना वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी प्रशालेने शाळेमध्ये लॉकर सुविधा सुरू केली आहे.

शाळेचे मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांच्या पुढाकाराने माजी विद्यार्थी नारायण दाते यांच्या विशेष सहकार्यातून त्यांची बहीण अपर्णा रघुनाथ कर्वे (सुधा दाते) यांच्या स्मरणार्थ मुंबई येथील प्रसाद रघुनाथ कर्वे यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा प्रारंभ नुकताच शिक्षणप्रेमी जयंत दाते, डॉ. श्रीनिवास बापट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, उपाध्यक्ष मानसी आईर, गणपत परवडी, वामन नाखरेकर, विजय नाखरेकर, रूंजी नांगरेकर, काजल आईर, शिक्षक लक्ष्मण फडके, विशाल सपकाळ, विठ्ठल मंगे उपस्थित होते. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

दप्तरमुक्त शाळा उपक्रमामध्ये विद्यार्थी पाठ्यपुस्तके घरी न नेता शाळेमध्ये ठेवतात. त्या पाठ्यपुस्तकांच्या साहाय्याने दिवसभर शाळेमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करणे आणि त्यांना दैनंदिन होमवर्क देण्यासाठी अन् त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी दिवसभरातील प्रशालेतील अभ्यासासाठी एक तर शाळेतून घरी गेल्यानंतर करावयाच्या अभ्यासाची एक अशी दोन वर्कबुक असतात. त्यामुळे शाळेतून घरी गेल्यावर अभ्यासाची केवळ एक वर्कबुक घेऊन विद्यार्थी घरी जातो आणि तेवढीच घेऊन शाळेमध्ये येतो.

त्यासाठी लागणारे लॉकर सुविधा
अभ्यासाची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांकडून या लॉकरमध्ये ठेवली जातात. दप्तरमुक्त शाळा उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमही राबवले जात आहेत. - दीपक धामापूरकर, मुख्याध्यापक, सोलगाव शाळा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:48 PM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow