ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील १५० गावांत २२८५.७५ हेक्टरवर फळ लागवड

Jun 22, 2024 - 16:26
Jun 22, 2024 - 17:08
 0
ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील १५० गावांत २२८५.७५ हेक्टरवर फळ लागवड

रत्नागिरी : गेल्या सहा वर्षांत रत्नागिरी तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील २२८५.७५ हेक्टर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यासाठी ३५२८ मजुरांना ११ कोटी ८४ लाख १ हजार ८७९ रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला.

कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या ६ वर्षात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी ११ कोटी ८४ लाखाहून अधिक निधी खर्ची पडला आहे. या योजनेत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत शेतीपूरक रोजगार मिळवला.

शासनाच्या योजनेसाठी तालुक्यातील अनुसूचित जाती- जमाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री व दिव्यांग कुटुंबप्रमुख कुटुंबे, प्रधानमंत्री आवास योजना, पारंपरिक वनवासी प्रवर्गातील ऑनलाईन जॉब वितरित करण्यात आले.

२०१८-१९ मध्ये ४३४.८० हेक्टर क्षेत्रावर ६१९ मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ८० लाख ४६ हजार २६ रुपयांचा निधी खर्ची पडला. २०१९-२० मध्ये ७४९ मजुरांनी ५६१.९५ हेक्टर क्षेत्रावर २ लाख २५ हजार ३३९ रुपये खर्ची पडले. २०२०- २१ मध्ये ३८१.४५ हेक्टर क्षेत्रावर ६२९ लाभार्थी मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ७२ लाख ७४५ रुपये खर्ची पडले. २०२२-२३ मध्ये २६०.७० हेक्टर क्षेत्रावर ४२४ मजुरांनी लागवड केली. २०२३-२४ आर्थिक वर्षात २६ डिसेंबर अखेरपर्यंत ५१२ लाभार्थी मजुरांनी २९०.६० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 22/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow