उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

Sep 17, 2024 - 17:08
 0
उद्धव ठाकरेंनी केले ते करायची हिंमत आहे का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राइक रेटची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी. मग स्ट्राइक रेट जरूर दाखवावा. आमच्यामध्ये स्ट्राइक रेट हा विषय कुठेच येत नाही. पैसा आणि यंत्रणा हा सर्व महायुतीचा स्ट्राइक रेट आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. स्वाभिमान अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. भाजपा प्रमुख पक्ष आहे बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे. आश्रित असतात तेव्हा त्यांना आवाज नसतो. भाजपाबरोबर स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना आहे आणि प्रसंगी लाथ मारून उद्धव ठाकरे, आम्ही बाहेर पडलो. अशी हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही. ही शिवसेनेमध्ये होती. आम्ही बाहेर पडलो. भाजपामध्ये दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळ आहे. जे काही त्यांच्यासमोर ते येतील तुकडे ते त्यांना स्वीकारावे लागेल. जे काय मिळते ते गप्प पणे घ्या ही भाजपाची भूमिका राहिली आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

…तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह कायद्याने मिळाले नसते

स्ट्राइक रेट काय असतो, हा स्ट्राइक रेट भाजपा आणि मोदी शाहांमुळे झाला. मोदी आणि शाहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह कायद्याने मिळाले नसते, असा दावा संजय राऊतांनी केला. तसेच आमच्यामध्ये स्ट्राईक रेट हा विषय कुठेच येत नाही. जागावाटप संदर्भात उद्यापासून आमची चर्चा सुरू होईल. आम्ही तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसणार आहोत आणि त्यातून जो फॉर्मुला येईल कोणी कुठून लढायचे तो अंतिम राहील. जिंकेल त्याची जागा हीच पक्षाची मागणी आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

दरम्यान, आम्हाला शिव्याशाप देतात, आरोप करतात, मला कलंकनाथ नाव दिले परंतु महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाला कलंक ते आहेत. हिऱ्याच्या पोटी गारगोटी असे मी म्हणतो, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हा खऱ्याअर्थाने सर्व संपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 17-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow