युती धर्मामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे झाले बोन्साय : बाळ माने

Sep 19, 2024 - 13:41
 0
युती धर्मामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे झाले बोन्साय : बाळ माने

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभेवर भाजपने दावा सांगितला असून, काल ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलनामध्ये जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी आमदार बाळ माने या दोघांनीही हा मतदारसंघ भाजपला मिळण्याची जोरदार मागणी करत शड्डू ठोकले. युती धर्मामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे बोन्साय झाले असून, २०१७ मध्ये स्वबळावर लढलो, हाती शून्य आले; पण आता खासदार निवडून आले आहेत. आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थादेखील जिंकायची महत्त्वाकांक्षा आहे, असा सूर आजच्या मेळाव्यात उमटला.

लहान बाळाचा जसा पांगुळगाडा काढला जातो, तसा युतीचा गाडा काढला पाहिजे, तरच पक्ष वाढेल, असे माने यांनी सांगितले. 

बूथप्रमुख, पन्नाप्रमुख पूर्ण तयारी करूया. ३५० बूथमध्ये किमान ४० पदाधिकारी जोडूया. नकारात्मका विचार सोडा. माने गरीब आहेत, मग कसे होणार, असा विचार करू नका. आपल्याकडे एनटीद्वार बैंक आरसी बँक व कार्यकर्त्यांची मोठी बँक आहे. दोन वर्षे वनवास सहन करतोय तेव्हा कोण येत नाही विचारायला. या सर्व प्रकारावर भाजपने प्रतिक्रिया दिली नाही, तर एखाद्या दुसऱ्या पक्षाला संधी मिळते. समर्थ व सक्षम पर्याय म्हणून जनतेने भाजपकडे पाहिले पाहिजे आपण युतीत फरफटत जायचे, मांडलिक व्हायचे, याबाबत ठरवले पाहिजे. कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याची हाच योग्य वेळ आहे. कार्यकर्त्यांनी भाजप हा सक्षम पर्याय असल्याचा प्रचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी व्यासपीठावर हा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतेज मानलावडे, अनंत मराठे, दादा दळी, राजन फाळके, अॅड. विलास पाटणे, सतीश शेवडे, अॅड. धनंजय भावे, ऐश्वर्या जठार, विनोद म्हस्के, प्रशांत डिंगणकर आदी उपस्थित होते.

भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला

माने यांनी रत्नागिरीत भाजपच्या फॉर्म्युला सांगितला. एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी मतदारसंघात भाजपला ७५ हजार मते, विरोधकांना ८५ हजार व अन्य उमेदवारांना व नोटाला काही मते मिळाली. विधानसभेची स्थिती पाहता, भाजपची हमखास ६० हजारांहून अधिक मते आहेत. काही आपले मतदार येऊ शकले नव्हते, अशी १० हजार मते, तळ्यात मळ्यात असणारी अशी २० हजार मते आहेत. त्यामुळे भाजपची मते १ लाखांपर्यंत नेणे शक्य आहे. युती, आघाडीतले ६ पक्ष आहेत व अन्य पक्ष आहेत. साधारण दोन लाख मतदान होईल. त्यातील लाखभर मते मिळवली की, जय भाजपचाच असा दावा त्यांनी केला.

हक्काचा आमदार मिळावा
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले, "गुहागरमध्ये भाजपचे आमदार असतानाही सेनेला उमेदवारी दिली. त्याप्रमाणेच रत्नागिरीमध्येही असे करता येईल. त्याकरिता ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे बोलले पाहिजे. हा प्रयोग रत्नागिरीत करायला काय अडचण आहे, असे विचारा. दुसऱ्या इच्छुकांना विधान परिषद द्या, राज्यसभा द्या, आमचे काही म्हणणे नाही. भाजपला हक्काचा आमदार मिळाला पाहिजे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow