ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतच्या CISF महिला जवानाने कानशिलात लगावली?

Jun 6, 2024 - 17:12
 0
ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतच्या CISF महिला जवानाने कानशिलात लगावली?

चंदिगड : अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंगना राणावत नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे.

यानंतर कंगना आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिच्या कानशिलात लगावण्यात आल्याची घटना समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्डने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगनाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. कंगनाने कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 06-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow