राष्ट्रपती भवनातील 'दरबार' आणि 'अशोक' हॉलची नावं बदलली, आता 'या' नावानं ओळखलं जाणार

Jul 25, 2024 - 15:29
Jul 25, 2024 - 15:42
 0
राष्ट्रपती भवनातील 'दरबार' आणि 'अशोक' हॉलची नावं बदलली, आता 'या' नावानं ओळखलं जाणार

वी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील दोन महत्त्वाच्या सभागृहांची नावं बदलण्याचा मोठा निर्णय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी घेतला आहे. त्यानुसार 'दरबार हॉल' आणि 'अशोक हॉल' या दोन सभागृहांची नावं बदलण्यात आली आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आता राष्ट्रपती भवनातील 'दरबार हॉल'चं नाव 'गणतंत्र मंडप' आणि 'अशोका हॉल'चं नाव 'अशोक मंडप' असं केलं आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाद्वारे एक निवेदन जारी करण्यात आलं आहे.

दोन्ही सभागृहांची खासियत जाणून घ्या...

अशोक हॉल (अशोक मंडप)
अशोक हॉल जो आता अशोक मंडप म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या मंडपची खाशियत म्हणजे मोठं कलाकुसर असलेलं सभागृह असून आता महत्त्वाच्या समारंभासाठी आणि परदेशी प्रमुखांच्या ओळखपत्रांच्या सादरीकरणासाठी वापरलं जातं, जे पूर्वी स्टेट बॉल रूमसाठी वापरलं जात होतं. या अशोक मंडपचे छत तैलचित्रांनी सजलेलं आहे.

दरबार हॉल (गणतंत्र मंडप)
राष्ट्रपती भवनातील सर्वात भव्य सभागृह म्हणजे दरबार हॉल, ज्याला आता गणतंत्र मंडप असं नाव देण्यात आलं आहे. दरबार हॉल पूर्वी सिंहासन कक्ष म्हणून ओळखला जात होता आणि याठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारनं १५ ऑगस्ट १९४७ रोजी शपथ घेतली होती. १९४८मध्ये सी. राजगोपालाचारी यांनी दरबार हॉलमध्ये भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली. तसंच या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते नागरी आणि लष्करी सन्मान दिला जातो. याशिवाय, दरबार हॉलमध्येच नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow