50 हजारांची लाच स्वीकारताना रत्नागिरीत लिपिकाला सापळा रचत पकडले

Jul 11, 2024 - 14:30
Jul 11, 2024 - 14:33
 0
50 हजारांची लाच स्वीकारताना रत्नागिरीत लिपिकाला सापळा रचत पकडले

रत्नागिरी : सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी 50 हजारांची लाच स्विकाताना लीपिकाला रत्नागिरीत लाचलुचपत विभागाने सापळा रचून पकडल्याची घटना गुरूवार 11 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. विनायक रामचंद्र भोवड (57 वर्षे, मुख्य लिपिक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी रा. ‘स्वामी’ त्रिविक्रम नगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी (वर्ग-3) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

संशयित आरोपी विनायक रामचंद्र भोवड हा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्थेचा मुख्य लिपिक असून त्याने तक्रारदार यांचे सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी 26 जून रोजी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व उप निबंधक ऑफिसला देण्यासाठी 50,000 इतक्या रुपयांची लाच मागितली होती. लाचेची 50,000 रुपये रक्कम 11 जुलै रोजी दुपारी 11:56 वाजता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक ९ रत्नागिरी कार्यालयात स्वीकारताना विनायक रामचंद्र भोवड याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेवर शहर पोलीस ठाणे रत्नागिरी येथे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

आरोपीला पडण्यासाठी पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, सपोफौ/संदीप ओगले, पोहवा/संतोष कोळेकर, पोहवा/ विशाल नलावडे, पो.ना./दिपक आंबेकर, पो.कॉ./हेमंत पवार, पो.कॉ./राजेश गावकर यांनी सापळा रचला. सापळा पर्यवेक्षण अधिकारी मा.श्री. महेश तरडे सो, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र तसेच मार्गदर्शन अधिकारी मा.श्री. सुनिल लोखंडे सो, पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र मा.श्री. महेश तरडे सो, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र, मा.श्री.गजानन राठोड सो, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. तपासी अधिकारी म्हणून अनंत कांबळे, पोलीस निरीक्षक, अतिरिक्त पदभार, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो २ रत्नागिरी यांनी काम केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow