Gold Price : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण..

Jul 24, 2024 - 15:34
 0
Gold Price : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण..

मुंबई : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर हा 64,000 रुपयांवर आला आहे.

तर मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 69602 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज 24 जुलै रोजी सकाळी 69194 रुपयांवर घसरला आहे.

सोन्याच्या दरात का होतेय घसरण?

सरकारने अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली असून, त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याचा भाव 69 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव 84 हजार रुपये प्रति किलोच्या वर पोहोचला आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 69194 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 84897 रुपये प्रति किलो आहे.

कशी मिळवाल सोन्या चांदीच्या दराची माहिती

काल संध्याकाळी (23 जुलै) 24 कॅरेट सोन्याचा दर 69602 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज 24 जुलैच्या सकाळी 69194 रुपयांवर घसरला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. दरम्यान, तुम्हाला जर लेटेस्ट सोन्या चांदीचे दर जाणून घ्यायचे अलतील तर, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस कॉल करु शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.

मुंबईत सोनं 5 हजार रुपयांनी झालं स्वस्त

सोन्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली आहे, ती 9 टक्क्यांवर खाली आली आहे. तसेच, जीएसटी व सेल्स टॅक्स मिळून कमीत कमी 6 टक्क्यांपर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे. त्यामुळे, मुंबईत 5 हजार रुपयांनी सोने स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या भावात 5 हजार रुपयांची घट झाल्याचं गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते आणि मुंबईतील सुवर्ण व्यापारी कुमार जैन यांनी सांगितलं. आता लगीन सराईचा सिझन आहे, त्यामुळे सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह, पुणे, जळगाव या प्रमुख शहरांसह राज्यातील सर्वच शहरात, गावांत सोन्याच्या दरात मोठी कपात झाली आहे. त्यामुळे, आपल्या परिसरातील सुवर्णपेढीत जाऊन किंवा ओळखीच्या ज्वेलर्सकडून तुम्ही आजचे सोन्याचे दर जाणून घेऊ शकता.

नेमका काय बदल झाला?

सोने, चांदीवरील सीमा शुल्क - 6 टक्के

प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के

अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow