रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना

Jul 5, 2024 - 14:27
 0
रत्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना

त्नागिरी : मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान विषयाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे.

मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षणाकरिता गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनापर साहाय्य मिळावे, याकरिता मराठी विज्ञान परिषदेने शिष्यवृत्ती योजना २०१६पासून नवीन स्वरूपात सुरु केली.

या शिष्यवृत्तीकरिता यावर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयातील आठ म्हणजे एकूण ३२ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

चालू २०२४-२०२५ शैक्षणिक वर्षात एमएस्सी, एमए (गणित) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांनी https://forms.gle/38QdFgHa12EtEX889 या लिंकचा उपयोग करावा. अधिक माहितीकरिता ९९६९१ ००९६१ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा. मराठी विज्ञान परिषदेच्या https://mavipa.org या संकेतस्थळावरही अधिक माहिती मिळू शकेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow