संगमेश्वरात एसटी बस आणि मारुती फोरनेक्सचा अपघात

Jun 28, 2024 - 16:58
 0
संगमेश्वरात एसटी बस आणि मारुती फोरनेक्सचा अपघात

संगमेश्वर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गवरील निढलेवाडी येथे एसटी बस आणि मारुती फोरनेक्स गाडीचा समोरासमोर अपघात झाला. दोन्ही बाजूला वाहनाच्या एक ते दीड की. मी. पर्यंत रांगा लागल्या होत्या. ही घटना दुपारी अडीच च्या सुमारास घडली. संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल होत ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. अपघाताची भीषणता पाहता सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर एसटी स्टॅन्ड पासून काही अंतरावर असलेल्या निढले वाडी येथील चिपळूणहून रत्नागिरीकडे एसटी बस चालक विकास कांबळे हे एसटी बस क्रमांक MH09FL1081 घेऊन जात असताना गोवा येथून मुंबई च्या दिशेने MH47BPO556 मारोती फॉरनेक्स गाडी ही चालक हे अमित चावला हे त्यांची पत्नी आशा चावला यांच्यासह जात असताना दुपारी अडीच च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यातील कोणीही जखमी झाले नसून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातामुळे मुबंई च्या दिशेने तसेच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूकडे मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागून वाहतूक खोलंबली होती. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस हेड कॉन्सटेबल शेलार, पोलीस कॉस्टेबल विश्वास बारगाले यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातात सुदैवाने कोणतीही मनुष्यहिनी झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन तस उलटून गेले तरी एसटी चालक विकास कांबळे यांनी सबंधिताना कल्पना देऊनही एस्टीचे अधिकारी पोहचले नव्हते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:27 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow