रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
![रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_66644ce112016.jpg)
रत्नागिरी : एकीकडे मान्सूनची (Monsoon Has Arrived In India) चाहूल लागली असताना नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसाकरिता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सोबतच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 08-06-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)