चिपळूण : खेर्डी एमआयडीसीच्या कॉलनीत भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण

Jun 10, 2024 - 10:34
 0
चिपळूण : खेर्डी एमआयडीसीच्या कॉलनीत भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण

चिपळूण : खेर्डी एमआयडीसी कॉलनीत वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या एका रस्त्याचे डांबरीकरण भर पावसात करण्याचा प्रयत्न ठेकेदाराने गुरुवारी सकाळपासून सुरू केला. मात्र, काम सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी हे काम रोखत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

पावसाळ्याला दि. ७ जूनला प्रारंभ होत असला तरी आपल्याकडे मे महिन्यात अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने शक्यतो १५ मे नंतर रस्ता डांबरीकरणाची कामे केली जात नाहीत. तशी बांधकाम खात्याकडूनच अधिकृत परवानगी दिली जात नाही. मात्र, असे असताना गुरुवारी खेड एमआयडीसी कॉलनीत एका रस्त्याचे डांबरीकरण केले जात होते.

मुळातच गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरण असतानाच दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान वर्षभरापूर्वी मंजूर असलेल्या रस्त्याचा शिल्लक राहिलेल्या भागाचे डांबरीकरण करण्याचा प्रयत्न रस्ता ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू होता. मुराद अडरेकर यांनी तेथे भेट देत हे काम थांबवले, शिवाय अधिकाऱ्यांनाही याबाबतचा जाब विचारत एमआयडीसीच्या सर्व कामांची माहिती मागवली.

कामाच्या चौकशीची मागणी करणार
पावसाळ्यात  खेर्डीसह  अनेक ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्याची कामे सुरू आहेत. अधिकारी मात्र त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आपण या कामाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 10/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow