राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन

Jun 10, 2024 - 10:42
 0
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा(NCP) आज 25 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटी नंतर दोन्ही पक्ष एकाच दिवशी आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्ष मुंबईत वर्धापनदिन साजरा करणार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अहमदनगरमध्ये (Ahmednagar) वर्धापन दिन साजरा करणार आहे.

गेल्या वर्धापन दिनाला शरद पवारांनी मोठा धक्का दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली होती. शरद पवारांनी भाकरी फिरवत आपले धक्कातंत्र दाखवून दिले होते. ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत, शरद पवार (Sharad Pawar) 'फॅक्टर' महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. शरद पवार कधी कोणता धक्का देतील हे सांगता येत नाही. शरद पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी सरप्राईज पॅकेज असतं, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज अहमदनगर येथे 25 वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नवनिर्वाचित खासदार, आमदार माजी आमदारांची उपस्थिती राहणारआहेत. दरम्यान आजचा वर्धापन दिन हा विशेष महत्वाचा आहे , कारण राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून आले त्यामुळे आम्हाला विशेष आनंद आहे असं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी म्हंटलंय. सोबतच आज काही पक्ष प्रवेश होतील का ? यावर बोलताना पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी सरप्राईज पॅकेज असतं आणि आज ते सरप्राईज पॅकेज खोललं जाईल असं सूचक वक्तव्य कळमकर यांनी केलंय.

रौप्यमहोत्सवाचा मान नगरकरांना मिळाला

लोकसभा निवडणुकीत नगरला मिळालेल्या विजयानंतर नगर शहरात पहिला विजय मेळावा यानिमित्ताने होणार आहे. विजयोत्सव साजरा करणे व आगामी विधानसभा निवडणूक हाच या मेळाव्याचा अजेंडा आहे, असे फाळके यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी करण्यात आली. दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदा रौप्यमहोत्सवाचा मान नगरकरांना मिळाला.

शरद पवारांच्या नगर मेळाव्याकडे लक्ष

शरद पवार कधी काय करतील याता नेम नसतो, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकींच्य पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या नगर मेळाव्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पहिला वर्धापनदिन आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला लोकसभेत चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी शरद पवार पक्षात काही बदल करतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow