पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्ग खचला..

Jun 10, 2024 - 11:05
 0
पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्ग खचला..

लांजा : तालुक्यातील वाकेड घाटात बोरथडे फाटा येथे महामार्ग खचला असून, पहिल्याच पावसात ही परिस्थिती उद्भवल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाने गेल्या महिन्यापासून गती घेतली होती. मात्र, बऱ्याच ठिकाणी मुंबई- गोवा महामार्गाची एक लेन ही सिमेंट काँक्रिट, तर दुसरी एक लेन ही डांबरी आहे. दरम्यान, शनिवारी कोसळलेल्या पहिल्याच पावसाचा फटका बसून मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड घाटात बोरथडे फाटा येथे मोरी खचली आहे.

महामार्गाचे घाई गडबडीत करण्यात आलेले हे काम निकृष्ट दर्जाचे झाले हे यावरून निदर्शनास येत असल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी सकाळपासूनच हा महामार्ग खचल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. पहिल्याच पावसाचा फटका बसून मुंबई-गोवा महामार्ग खचल्याने आगामी काळात यासारख्या अनेक अडचणी मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन कराव्या लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow