साठरेबांबर येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनप्रकरणी गुन्हा दाखल

May 30, 2024 - 11:35
 0
साठरेबांबर येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशनप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील साठरेबांबर येथील भराडीन वाडी आणि तेरेकरवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २८ मे रोजी ५.४५ ते ६.४५ वा. कालावधीत करण्यात आली आहे. राकेश रमेश यादव (रा. साठरेवांवर भराडीनवाडी, रत्नागिरी) आणि तुकाराम सदु खाकम (रा. साठरेबांबर तेरेकरवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही दारू बाळगण्याचा किंवा पिण्याचा कोणताही परवाना नसताना आपल्या पुढ्यात दारुच्या बाटल्या ठेवून पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow