लांजात वैद्यकीय अधिकारी अखेर रुजू

Jun 10, 2024 - 11:12
Jun 10, 2024 - 15:13
 0
लांजात वैद्यकीय अधिकारी अखेर रुजू

लांजा : ग्रामीण रुग्णालयात लांजा येथे एमबीबीएस डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी आमदार राजन साळवी यांनी रविवारपर्यंत लांजा ग्रामीण रुग्णालयास एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नांना यश आले असून, ग्रामीण रुग्णालय लांजा येथे शुक्रवारी नवीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरजकुमार पंदिरकर रुजू झाले आहेत.

लांजा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांची आ. राजन साळवी यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लांजा ग्रामीण रुग्णालयास एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जगताप यांनी दिले होते. डॉ. सुरजकुमार पंदिरकर यांनी पदभार स्वीकारला आहे.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, लीला घडशी, माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत मणचेकर, प्रसाद माने, नागेश कुरूप, छाया गांगण, नगरसेवक राजेश हळदणकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 10-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow