खेड : दीपक मोहिते यांचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक यांच्या विरोधात १५ ऑगस्टला उपोषण

Jul 1, 2024 - 10:52
Jul 1, 2024 - 10:54
 0
खेड : दीपक मोहिते यांचे  सहकारी संस्था सहाय्यक निबंधक यांच्या विरोधात १५ ऑगस्टला उपोषण

खेड : येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक सुनील मोरे यांच्या कार्यालयात दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती त्यांनी आजतागायत दिली नसल्यामुळे व खेड तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व नागरिक सहकारी पत संस्था तसेच परवानाधारक सावकार यांची त्रयस्त शासकीय लेखा परीक्षक नियुक्ती करून तत्काळ फेर शासकीय लेखा परीक्षण करण्याचे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असतानाही त्यांनी ते केले नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दीपक मोहिते दि. १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार आहेत. याबाबत त्यांनी संबंधित सर्व यंत्रणा निवेदन दिले आहे.

या निवेदनाबाबत माहिती देताना दीपक मोहिते यांनी सांगितले की, सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांच्या खेड कार्यालयाकडून दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी आपण माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मागितली होती. परंतु, ते माहिती देत नसल्यामुळे मी त्यांची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. तसेच खेड तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी व नागरी सहकारी पतसंस्था तसेच परवानाधारक सावकार यांचेकडून योग्य पद्धतीने नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा संशय असल्याने त्रयस्त शासकीय लेखा परीक्षक नियुक्ती करून त्यांची तत्काळ फेर शासकीय लेखा परीक्षण करण्याची विनंती मी सहकार विभागाला केली होती.

याबाबत देखील मोरे यांना वरिष्ठांचे आदेश असूनदेखील ते त्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे मी सरकारचे याबाबत लक्ष वेधण्यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी खेड तहसीलदार कार्यालय आवार उपोषण करणार आहे. मी माहीतीच्या अधिकारात मागितलेली माहिती मिळावी व सर्व सहकारी संस्था यांच्या फेर लेखापरीक्षण बाबतचा आदेश तातडीने द्यावेत या माझ्या प्रमुख मागण्या आहेत, असे श्री. मोहिते यांनी सांगितले.

याबाबत मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी सहायक निबंधक सुनील मोरे यांच्या मालमत्तेची ईडी, सी-वी-आय, ए. सी. बी. मार्फत चौकशी करण्यात यावी, त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात यावी, मोरे यांनी रजेचा अर्ज न देता जेव्हा खोट्या रजा उपभोगून वेतन व भत्ते घेतले आहेत. त्याची शासनाच्या खाती चलनाने रकम जमा करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे.

या निवेदनाची प्रत दीपक मोहिते यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहाय्यक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधिक्षक रत्नागिरी, तहसीलदार खेड, सहायक निबंधक सहकारी संस्था खेड, उपविभागीय पोलिस अधिकारी खेड, पोलिस निरीक्षक खेड यांना दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow