पहिल्याच पावसात रत्नागिरी- हातखंबा मार्गाची दयनीय अवस्था

Jun 10, 2024 - 17:54
Jun 10, 2024 - 17:26
 0
पहिल्याच पावसात रत्नागिरी- हातखंबा मार्गाची दयनीय अवस्था

रत्नागिरी : पहिल्याच पावसात रत्नागिरी- हातखंबा मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. खेडशी ते हातखंबा पट्ट‌यात कुठेही पाणी जाण्यासाठी गटारे बांधण्यात आलेली नाहीत. पूर्णतः नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड चिखालमय झाला असून, वाहनचालकांना चिखलाच्या रस्त्यामंधून प्रवास करावा लागत आहे. 

पूर्वीचे नैसर्गिक नाले बुजविण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच राहिलेला नाही काही दिवसांपूर्वी मिऱ्या - नागपूर महामार्गाचे काम जोरदार सुरू होते. मात्र, सध्या हे काम संथगतीने होत आहे. निवडणुकील्या पूर्वी या कामाने काही प्रमाणात गती घेतली होती जणू काही दिवसात हा रोड पूर्ण होईल असे वाटत होते. परंतु, आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कामाची गती मंदावल्याचे चित्र आहे. काही भागापुरती कॉक्रिटीकरणची एक मार्गिका करून इतर भागात रस्त्यावर खडी पसरवून ठेवण्यात आली आहे, तर काही ठीकाणी मातीचा रोड तशाच स्थितीत आहे. त्यामुळे रस्त्यावर अक्षशः चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

रत्नागिरी ते हातखंबा हा वर्दळीचा रस्ता आहे. खेडशी ते हातखंबा भागात पाणी वाहून जाण्यासाठी गटारे बांधण्यात आली नसल्याने पाण्याचा निचरा होणार कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे. चौपदरीकरणाचे रस्ते रुंद असल्याने रस्त्याच्या बाजूला असणारे नाले बुजवले गेले आहेत, नवीन नाले निर्माण करणे गरजेचे असतानाही पावसाळा तोंडावर आला तरीही ठेकेदार कंपनीने अद्याप नाले तयार केलेले नाही. पहिल्याच पावसात सर्वत्र पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहिले आहे. त्यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे.

जिल्हाधिकारी सिंह यांनी केल्या होत्या सूचना
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी महामार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी संबधित ठेकेदार कंपनीला समस्याबाबत सूचना केल्या होत्या तसेच महामार्ग पोलिस उपअधीक्षक पलंगे यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीने इंजिनिअर यांची बैठक घेतली होती. परंतु, या सूचनांकडे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने पहिल्याच पावसात ही परिस्थिती ओढवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 PM 10/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow