मेघी बावनदीत आपत्कालीन परिस्थितीची प्रात्यक्षिक

Jun 12, 2024 - 10:21
 0
मेघी बावनदीत  आपत्कालीन परिस्थितीची प्रात्यक्षिक

साडवली : देवरूखजवळील मेघी बावनदी येथे आपत्कालीन स्थितीत बुडणाऱ्याला कसे वाचवावे, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या नियोजनात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. मेघी बावनदी येथे राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे कार्यकर्ते, सोहम लाड मित्रमंडळ व देवरूख पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. आपत्कालीन साहित्यासह बुडणाऱ्याला कसे बाहेर काढावे, पाण्यात अडकलेल्या माणसांना कसे बाहेर काढावयाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. देवरूख पोलिस ठाणे, राजू काकडे हेल्प अॅकॅडमी, देवरूख नगरपंचायत देवरूख, पंचायत समिती आपत्कालीन विभाग यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्तीवेळी संपर्क नंबरही जाहीर करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 12/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow