खेड : सवणस मोहल्ला येथे घरफोडी; ९३ हजारांचा मुद्देमाल लंपास

Jun 12, 2024 - 10:28
 0
खेड : सवणस मोहल्ला येथे घरफोडी; ९३ हजारांचा मुद्देमाल लंपास

खेड : तालुक्यातील सवणस मोहल्ला येथील बंद घर एका अज्ञात चोरट्याने फोडून घरातील सुमारे ५ हजारांच्या रोकड रकमेसह घरगुती वापराची ८८,४०० रु. कि.ची. तांब्याची भांडी चोरून नेल्याची घटना ९ जून रोजी सकाळी ९.४५ वा च्या सुमारास उघडकीस आली. 

सवणस मोहल्ला येथील घर २६ मे ते ९ जून या कालावधीमध्ये बंद होते याचा फायदा चोरट्याने घेऊन घर फोडून घरातील रोकड रक्कम व तांब्याची घरगुती वापराची भांडी चोरून नेली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow