District Collector Office Marathi Bhasha Cell: जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘मराठी विकास कक्ष’; ना. उदय सामंत यांचे तातडीने जागा उपलब्ध करण्याचे निर्देश

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत सुरू होणार ‘मराठी विकास कक्ष’; प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी तत्त्वावर होणार ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

रत्नागिरी :
District Collector Office Marathi Bhasha Cell अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्वतंत्र ‘मराठी भाषा विकास कक्ष’ सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत.

District Collector Office Marathi Bhasha Cell: दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक
ना. उदय सामंत यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि भाषा अधिकार्‍यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे (Video Conferencing) बैठक घेतली. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, संचालक डॉ. शामकांत देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. तसेच मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी हेदेखील दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

कक्षासाठी ५०० ते ६०० चौ. फुटांची जागा आणि बायोमेट्रिक हजेरी
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा परिसरात ५०० ते ६०० चौरस फुटांची जागा या कक्षासाठी उपलब्ध करून दिली जाईल. या कक्षाची स्थापना आणि फर्निचरचा सर्व खर्च मराठी भाषा विभागामार्फतच केला जाणार असून जिल्हा प्रशासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. तसेच, कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेचे पालन करणे बंधनकारक असून बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे.

उपक्रम, पदभरती आणि अंमलबजावणी
या कक्षाच्या माध्यमातून खालील ५ ते ६ महत्त्वाचे उपक्रम राबवले जातील:

Baguass

साहित्य व उपक्रम: जिल्ह्यातील साहित्य संमेलनांचे आयोजन करणे, स्थानिक साहित्यिकांशी संपर्क साधणे, आणि दुर्लक्षित/अप्रकाशित साहित्याचे पुनरावलोकन करून ते वाचनालयांपर्यंत पोहोचवणे.

कंत्राटी पदभरती: प्रत्येक कक्षासाठी एक जिल्हा मराठी भाषा अधिकारी आणि त्याला साहाय्यासाठी २ लिपीक-टंकलेखक व १ शिपाई अशी ४ पदे बाह्ययंत्रणेद्वारे (कंत्राटी तत्त्वावर) नियुक्त केली जाणार आहेत.

अभिजात दर्जाचा प्रभाव: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सुरू असलेले काम वेगाने पुढे नेले जात असून भाषा अधिकार्‍यांच्या वेतनात वाढ करण्याचा विचार सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 08-10-2026