वाळू साठवणूक प्लॉटला मंजुरी देण्याची मागणी
मंडणगड :
Mandangad Sand Shortage Construction Impact अंतर्गत मंडणगड तालुक्यातील सावित्री खाडीअंतर्गत म्हाप्रळ-बाणकोट अंतरात ड्रेझरद्वारे वाळू गटांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र वाळू साठवणूक प्लॉटला आवश्यक ती कायदेशीर मंजुरी न मिळाल्यामुळे प्रत्यक्षात वाळू उपसा अद्याप सुरू झालेला नाही. यामुळे वाळूच्या अभावाचा परिणाम तालुक्यातील बांधकाम क्षेत्रावर झाला असून वाळू साठवणूक प्लॉटसाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी म्हाप्रळ येथील सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Mandangad Sand Shortage Construction Impact: घरकुले आणि खासगी बांधकामे ठप्प
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकाम क्षेत्रातील सर्वच घटकांमध्ये उदासीनता पाहायला मिळत आहे. वाळूच्या टंचाईमुळे पंतप्रधान आवास योजना आणि इतर शासकीय योजनांमधील घरकुलांची कामे, खासगी घरांची बांधकामे तसेच इतर विकासकामे पूर्णपणे रखडली आहेत.
ड्रेझर निविदाधारकांची अडचण आणि कायदेशीर मंजुरीचा प्रश्न
वाळू उपसा केल्यानंतर तिच्या साठवणुकीसाठी म्हाप्रळ येथे निश्चित करण्यात आलेल्या प्लॉटच्या अकृषक (NA) परवानगीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकृत वाळू साठवणूक प्लॉट उपलब्ध नसल्याने निविदाधारकांना ड्रेझरचा ताबा घेऊन प्रत्यक्ष वाळू उपसा सुरू करण्यात अडचणी येत आहेत. टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही नागरिकांना नियमानुसार वाळू मिळत नसल्याने ही भयानक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हाप्रळ येथील वाळू साठवणूक प्लॉटला आवश्यक ती कायदेशीर मंजुरी देऊन ड्रेझर निविदाधारकास वाळूची उपलब्धता करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी बिलाल म्हाळुणकर यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 08-10-2026














