रत्नागिरी : जिल्हा परिषदेला चार दिवस सुट्टी

रत्नागिरी : जिल्हा परिषदेला यंदा गुरुवार (दि.३१) पासून दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. गुरूवारी नरक चतुदर्शी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. तर शुक्रवारी लक्ष्मी पूजन असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. तर शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार दिवस सुट्टी आहे.

दिवाळीच्या सुट्टया जरी ३१ ऑक्टोबरपासून असल्या तरी काही कर्मचाऱ्यांनी सोमवारपासूनच सुट्ट्या टाकल्या असून सणानिमित्त बाहेर गावी जाऊन आनंद लुटत आहेत. दि. १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाल्याने सध्या जिल्हा परिषदेतील कामकाज थंडावले आहे. याचाच फायदा घेत काही कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबरपासून सुट्ट्या टाकल्या.

शनिवारी बलिप्रतिपदा अर्थात पाडवा, आणि रविवारी भाऊबीज असली तरी विकेंड असल्याने शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. विकेंड आल्याने कर्मचाऱ्यांच्या दोन सुट्ट्या कमी झाल्या आहेत. सोमवारपासून जिल्हा परिषदेचे नियमित कामकाज सुरू होणार आहे. यावर्षी सलग चार सुट्टया आल्या असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद असला तरी दोन सुट्ट्या कमी झाल्याने आनंदावर विरजण पडले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 31/Oct/2024

Amey jwelrs