रत्नागिरी: मिरकरवाडा बाजारपेठ परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या ‘त्या’ अज्ञात प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी: शहरातील मिरकरवाडा बाजारपेठ परिसरात काही दिवसांपूर्वी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका अज्ञात प्रौढ व्यक्तीचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद

६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१५ वाजता या व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती डॉ. शुभम वाघधरे यांनी दिली आहे. ही व्यक्ती मिरकरवाडा बाजारपेठेत गंभीर अवस्थेत सापडली होती, त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली असून, पोलीस या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 09-04-2026