दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध ‘कड्यावरचा गणपती’ मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील मोठी रोकड लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना १३ एप्रिल रोजी उघडकीस आली. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटीवर हात साफ केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, त्यामध्ये काही संशयितांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. या फुटेजच्या आधारे पोलीस आता तपास चक्रं फिरवत आहेत.
भाविकांमध्ये संतापाची लाट
या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 15-04-2026














