◼️ प्रशालेत प्रथम कु. स्वरा महाडिक (98.20%) गुण, द्वितीय कु. गार्गी आग्रे, कु. अवनिश जगताप व कु. श्राव्य निकम (98 %) व तृतीय कु. आर्या खेडेकर व कु. अनिश मणकापुरे (97.80 %).
◼️ सी. बी. एस. ई. बोर्डाच्या इ. दहावीच्या परीक्षेत आय. टी. विषयामध्ये 20, मराठी विषयात 9, कला विषयामध्ये 4, संस्कृत विषयात 1 विद्यार्थ्याने 100 पैकी 100 गुण मिळविले.
खेड –
दिनांक – 15 एप्रिल 2026.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सी. बी. एस. ई. इयत्ता 10 वीचा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान सुयश प्राप्त केले.
या निकालामध्ये कु. स्वरा महाडिक (98.20 %) गुण मिळवून प्रशालेत प्रथम, कु. गार्गी आग्रे, कु. अवनिश जगताप व कु. श्राव्य निकम (98 %) मिळवून द्वितीय व कु. आर्या खेडेकर व कु. अनिश मणकापुरे (97.80 % ) गुण प्राप्त करून प्रशालेत तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे.
या दैदिप्यमान यशामध्ये आय. टी. विषयामध्ये 20 विद्यार्थ्यांनी, मराठी विषयामध्ये 9 विद्यार्थ्यांनी, कला विषयामध्ये 4 विद्यार्थ्यांनी तर संस्कृत या विषयामध्ये 1 विद्यार्थ्याने 100 पैकी 100 गुण प्राप्त करत पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची परंपरा कायम राखली आहे.
95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या 32 विद्यार्थ्यांमध्ये कु. अनुष्का वारे, कु. ओम सुर्वे, कु. आर्या दळवी, कु. वेद कालेकर, कु. स्नेहा दिवेकर, कु. स्मित चिखले, कु. शिवप्रसाद वाघ, कु. एस. ईशा, कु. हादी मुकादम, कु. वेद गायकर, कु. शिवतेज लठ्ठे, कु. रुद्र हेळगावकर, कु. शाल्मली पवार, कु. गुुुफरान नाडकर, कु. तनिष्का भैरवकर, उत्कर्ष राठोड, कु. आराध्य दरेकर, कु. रुद्र शिगवण, निल बारटक्के, कु. लावण्या पाटोळे, कु. निधी साळवी, कु. आर्यन निर्मळ, कु. अथर्व टिकेकर, कु. स्वरा पवार, कु. आर्यन नदाफ, कु. साक्षी मोहिते या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकूण 38 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 49 विद्यार्थी, 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 18 विद्यार्थी, 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
वरील विद्यार्थ्यांना दहावीच्या सर्व विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दहावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 16-04-2026













