गुहागर: १३ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून ठेकेदाराची निर्दोष मुक्तता

गुहागर: तालुक्यातील कुडगिरी येथील आंबोकर कुटुंबियांकडून दाखल करण्यात आलेल्या १३ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून गुहागर न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक मुश्ताक खान सरगुरो यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

कुडगिरी येथील आंबोकर कुटुंबियांनी २०१४ मध्ये आपल्या जुन्या घराच्या जागी नवीन घर बांधण्यासाठी पेवे येथील बांधकाम व्यावसायिक मुश्ताक खान सरगुरो यांना ठेका दिला होता. या कामासाठी एकूण १३ लाखांचा व्यवहार ठरला होता. यात ८ लाख रुपये रोख आणि ४ लाख ६५ हजार रुपये हे घराच्या जुन्या सामानाची किंमत असे स्वरूप निश्चित करून तसा अधिकृत करारही करण्यात आला होता.

नेमका वाद काय होता?

करारानुसार २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत घर बांधून मिळणे अपेक्षित होते. मात्र, कामाला सुरुवात करूनही घर पूर्ण न झाल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही बांधकाम अर्धवट राहिल्याने आंबोकर कुटुंबियांनी २०१९ मध्ये मुश्ताक खान सरगुरो यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार सरगुरो यांच्यावर १३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

न्यायालयाचा निकाल

हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. पुराव्यांचे आणि तपासाचे अवलोकन केल्यानंतर गुहागर न्यायालयाने या प्रकरणातून ठेकेदार मुश्ताक खान सरगुरो यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Tata motars tiago

कायदेशीर लढाई

या दाव्याच्या सुनावणीदरम्यान ठेकेदार सरगुरो यांच्या वतीने ॲड. संकेत साळवी यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना या कायदेशीर लढाईत ॲड. अलंकार विखारे, ॲड. सुप्रिया वाघधरे, ॲड. मानसी सोमण आणि ॲड. रोशनी पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 23-04-2026