रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर रस्त्यावर येत असताना रिक्षाला दुचाकीने ठोकरले. या अपघातात स्वारासह रिक्षा चालक व प्रवासी जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३०) ऑक्टोबरला रात्री बाराच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षा चालक लतीकेश कमलाकर भोरे हे रिक्षा (क्र. एमएच -०८बीसी ०४९४) घेऊन सोबत त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या लोकांना उपचारासाठी घेऊन येत असताना नाचणे-पॉवर हाऊस बसस्टॉप येथे आरोग्य मंदिरकडे वळत असताना मारुती मंदिरहून येणारी दुचाकी (क्र. एमएच-०८ एबी ७७०५) वरील स्वार आर्यन संतोष नागवेकर (२०) याने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील प्रवाशांसह दोन्ही चालक जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 02-11-2024













