रत्नागिरी येथे तालुकास्तरीय ग्रामीण एक ग्रामपंचायत एक वॉर्ड भव्य नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा

रत्नागिरी : माजी विद्यार्थी संघ,मराठा मंदिर अ. के.देसाई हायस्कूल रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय ग्रामीण एक ग्रामपंचायत एक वॉर्ड भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन दि:-22,23,24 मे 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 11 वा. प्रशालेच्या पटांगणात करण्यात आले आहे.विजेत्या संघास रुपये 25000/- रोख बक्षीस व आकर्षक चषक आणि उपविजेत्या संघास रुपये 15000/- रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

याशिवाय अन्य पारितोषिकेही देण्यात येणार आहेत तरी सर्व इच्छुक संघांनी आपली नावनोंदणी दि :-19/5/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत करावी .प्रथम येणाऱ्या पहिल्या 16 संघाना या स्पर्धेत सहभागी होता येईल या स्पर्धेसाठी 3000/-रुपये प्रवेश फी अनिवार्य आहे. फी जमा केल्याशिवाय प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही.

नावनोंदणीसाठी संपर्क
1)आकाश परीट :-9130264354
2)योगेश कोरगावकर :-9822159755
3)अच्युत गजभिये :-7020416236
4)सुदेश निवळकर :-9730508675
5)मंदार आचरेकर :-9130275511
6) रणजित सुवारे :-9689165253

वरील सर्व आयोजक व्यक्तीशी संपर्क करून आपल्या संघाची नावनोंदणी संपूर्ण प्रवेश फी भरून त्वरीत करावी असे आवाहन शाळेच्या माजी विद्यार्थी संघामार्फत करण्यात आले आहे.

Tata punch

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 16-05-2026