बालेवाडी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जतीन भोसले याचे कांस्यपदक

पुणे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे १६ मे २०२६ रोजी आयोजित “महाराष्ट्र राज्य सिनियर व लोअर एज ग्रुप ॲक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६” स्पर्धेत अंडर-12 वयोगटात रत्नागिरीच्या Aquatechniques Ratnagiri Swimming Club चा जलतरणपटू जतीन किशोर भोसले याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. जतीनने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जतीनच्या यशामागे त्याची कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव तसेच प्रशिक्षक विवेक विलणकर सर यांचे उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जतीनने ही यशस्वी कामगिरी नोंदविली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

जतीनच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 18-05-2026