Congress Shashi Tharoor Reaction On Cockroach Janata Party: सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवक व झुरळांसंबंधी केलेल्या कथित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ने खळबळ माजवली असून, १६ मे रोजी सुरू झालेले ‘एक्स’वरील हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले.
मात्र, काही वेळातच ‘कॉक्रोच इज बँक’ नावाने नवीन हँडल सुरू करून ‘कॅम्पेन’ सुरू करण्यात आले. यावरून देशात दोन गट पडले आहेत. यातच काँग्रेस खासदार शशी खरूर यांनी याला पाठिंबा दिला आहे.
कोक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. तर कोक्रोच जनता पार्टी स्थापनेनंतर आता अभिजित दीपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यातच आता काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी यास पाकिस्तानी-निर्मित कट म्हणून फेटाळून लावले, पण हा दृष्टिकोन खूपच सोपा आहे: अभिजित दीपके यांनी असा प्रतिदावा देखील केला आहे की त्यांचे ९४ टक्के फॉलोअर्स भारतात आहेत. इन्स्टाग्रामने यावर स्पष्टीकरण द्यायला हवे. सत्य काहीही असो माझा मुद्दा हा आहे की, लोकशाहीत हे दडपून टाकणे मूर्खपणाचे आहे. लोकशाहीचा सर्वांत मोठा गुण म्हणजे ती लोकांच्या भावना, निराशा आणि तक्रारी व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. या गोष्टींना एका व्यंग्यात्मक पद्धतीने व्यक्त होऊ देणे हे राष्ट्रीय हिताचेच आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे.
दडपून टाकणे हे अत्यंत विनाशकारी ठरेल
संस्थापकांची हेतू काहीही असला तरी त्यांनी आपल्या तरुणांमधील राष्ट्रीय भावनेच्या एका महत्त्वाच्या प्रवाहाचा वेध घेतला आहे, हे नाकारता येत नाही. आपल्या लोकशाहीचे रक्षक म्हणून, सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनीही आता सावध होऊन, या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामागील सुप्त असंतोष हाताळला पाहिजे. याकडे दुर्लक्ष करणे, याचा इन्कार करणे आणि सर्वांत वाईट म्हणजे, याला दडपून टाकणे हे अत्यंत विनाशकारी ठरेल, अशी भीती शशी थरूर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अशी चळवळ प्रेशर-कुकरच्या व्हॉल्व्हप्रमाणे काम करतात, ज्यामुळे वाफ बाहेर पडते. जर व्हॉल्व्ह बंद केले गेले, तर दाबामुळे कुकरचा स्फोट होऊ शकतो. गोंधळ, अराजकता किंवा क्रांतीपेक्षा उपहास अधिक आवडतो. मला असेही वाटते की, तरुण भारताच्या समस्या ओळखणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे. चला, बंदी उठवूया आणि लक्ष देऊया!, असे आवाहन शशी थरूर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:55 22-05-2026














