रत्नागिरी : बाल संरक्षण हक्क आयोगाकडून आज सुनावणी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोगाच्या प्रशिक्षणादरम्यान अध्यक्ष व सदस्य यांच्यासमोर एका बालकाबाबत तक्रार उपलब्ध झाली होती. तक्रारीची तत्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोगाने संबंधित तक्रारदाराकडून तक्रार दाखल करून घेतली.

संबंधित तक्रारदार व तक्रारीशी संबंधित असलेल्या सर्व शासकीय यंत्रणेने बुधवारी, दि. 27 मे रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणाऱ्या सुनावणीमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ही माहिती जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 27-05-2026