मुख्यमंत्री ‘थलापती’ विजय यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची घेतली भेट

TN CM Joesph Vijay Met PM Modi: तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष सी. जोसेफ विजय हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रादिल्लीत दाखल झाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या सेवा तीर्थ या कार्यालयात भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचे दोन्ही नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

२५ मिनिटांची महत्त्वपूर्ण बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय यांच्या भेटीचे फोटो समोर येताच त्याची चर्चा सुरु झालीय. थलापती विजय हे अत्यंत साध्या वेशभूषेत म्हणजेच ब्लॅक ब्लेझर, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अशा फॉर्मल लुकमध्ये पंतप्रधानांना भेटायला पोहोचले होते. त्यांनी पंतप्रधानांना फुलांचा बुके देऊन त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनीही यावेळी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर विजय यांची ही पहिलीच अधिकृत भेट आहे.

मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदींसमोर मांडलेले प्रमुख मुद्दे

औपचारिक संवादानंतर मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडूच्या विकासासाठी आणि मागण्यांसाठी पंतप्रधान मोदींना एक सविस्तर निवेदन दिले. नेदरलँड्समधून अनाईमंगलम ताम्रपट परत आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच तमिळनाडू सरकारच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांची सुरुवात तमिळ थाई वझ्थू या राज्यगीताने करायला हवी अशी गृह मंत्रालयाकडे मागणी केली. तमिळनाडूमध्ये डीआरडीओचे ‘सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टम्स’ सुरु करण्याची विनंती यावेळी विजय यांनी केली.

यावेळी विजय यांनीकर्नाटकच्या प्रस्तावित मेकेदातु धरण प्रकल्पावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. हा प्रकल्प कावेरी लवाद आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशांविरुद्ध असल्याचे सांगत, तमिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीच्या संमतीशिवाय या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये, अशी आग्रही मागणी केली. तसेच श्रीलंकेच्या नौदलाकडून तमिळनाडूच्या मच्छिमारांना अटक केली जात असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सध्या ५८ मछुआरे श्रीलंकेच्या ताब्यात असून २६६ बोटी जप्त आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी विजय यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 28-05-2026