“देवेंद्र फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप जगासमोर सिद्ध करू शकलो” : उज्ज्वल निकम

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच सर्वपक्षी नेते आता प्रचारसंभाचा धडाका सुरू करणार असल्याचे सांगिले जात आहे. देवेंद्र फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप जगासमोर सिद्ध करू शकलो, असे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

निर्णायक नेतृत्व हे भाजपाचे वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही कायम दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. मी भाजपामध्ये नसतानाही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या विषयात माझ्या सूचनांवर नेहमीच तात्काळ आणि योग्य निर्णय घेतले. राष्ट्रप्रथम ही मानसिकता असलेले नेतृत्व ज्यावेळी सत्तेत असते तेव्हाच अशी निर्णय क्षमता दिसून येते, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप जगासमोर सिद्ध करू शकलो

नोकरशाही काहीशी गोंधळलेली असताना देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायकतेमुळे आपण काही गोष्टी सिद्ध करू शकलो. ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी डेव्हिड हेडलेला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे कसाबला फाशी होऊन २६/११ च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचे षड्यंत्र असल्याची जी बाब आपण जगाच्या वेशीवर टांगू शकलो नव्हतो. ती त्यांच्या काळात न्यायालयात व्यवस्थित सिद्ध करून पाकिस्तानचे पाप आपण जगासमोर निर्विवादपणे उघड करू शकलो, असे उज्ज्वल निकम यांनी नमूद केले. भाजपा नेते विनय सहस्रबुद्धे यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 04-11-2024