रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी, महाड व गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, महाडच्या विद्यार्थ्यांचे MHT-CET (PCM) 2026 या परीक्षेत दैदिप्यमान यश

कु. निहार जोशी – 99.37 पर्सेनटाईल, कु. आर्या नाईक – 98.60 पर्सेनटाईल, कु. सम्यक शिर्के – 97.31 पर्सेनटाईल

( खेड – प्रतिनिधी )
दिनांक – 19 जून 2026

एमएचटी – सीईटी (MHT CET) पीसीएम ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी, महाड व गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, महाडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

इयत्ता 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रीकल्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एमएचटी – सीईटी ( MHT CET ) परीक्षा ऑनलाईन रित्या घेतली जाते. यावर्षीही ( MHT CET ) या परीक्षेत रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी, महाड व गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, महाडच्या PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 5 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल तर 7 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण मिळिवले.

( MHT CET) PCM या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. निहार जोशी – 99.37 पर्सेनटाईल, कु. आर्या नाईक – 98.60 पर्सेनटाईल, कु. सम्यक शिर्के – 97.31 पर्सेनटाईल, कु. मृदूल घटे – 93.72 पर्सेनटाईल व कु. आरुष पाटील – 93.37 पर्सेनटाईल यांनी 95 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ( MHT CET ) PCM या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 20-06-2026