Maharashtra Returning Monsoon: परतीचा मान्सून राज्यात २४ ते ४८ तासांत येणार!

५ ते १० ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज; ‘ऑक्टोबर हीट’मुळे तापमानात ४ ते ५ अंशांनी वाढ

पुणे :

परतीचा मान्सून पुढील २४ ते ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा महत्त्वपूर्ण अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे राज्यातील विविध भागांत येत्या ५ ते १० ऑक्टोबर या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका जाणवू लागला असून, कमाल तापमानात अचानक ४ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे.

Gadre1

उत्तर व मध्य भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परतीचा मान्सून पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून यशस्वीरीत्या माघार घेत आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकला आहे. पुढील दोन दिवसांत तो राज्यात प्रवेश करेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 03-10-2026