रक्ताच्या उलटीनंतर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

राजापूर तालुक्यातील आडीवरे येथील घटना; रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

रत्नागिरी :

राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा रक्ताच्या उलटी झाल्यानंतर उपचारादरम्यान रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. प्रीतम दिलीप शेटये (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नाते पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम शेटये यांना २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी असताना अचानक रक्ताच्या उलटी सुरू झाली. शेजारी सतीश रावजी करगुंटकर यांनी तत्परता दाखवत त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. सतीश करगुंटकर यांनी त्यांना २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर आयसीयू (ICU) मध्ये उपचार सुरू होते.

Mahrashi karve ANM

मात्र, उपचार सुरू असतानाच २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३१ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद नाते पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 03-10-2026