आजचे राशीभविष्य, २२ जून २०२६

मेष – आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल.

वृषभ – आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल.

इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद – विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन – लेखनात रस घ्याल.

मिथुन – आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल.

कर्क – आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील.

सिंह – आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल.

कन्या – आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनददायी राहील. प्रवास आनंददायी होईल.

तूळ – आज आपले बोलणे व व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल.

वृश्चिक – आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल.

धनु – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता.

मकर – आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल.

कुंभ – आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल.

मीन – आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या – फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 22-06-2026