Ram Mandir New Timings : अयोध्येतील राम मंदिरात १ नोव्हेंबरपासून दर्शनाच्या वेळात मोठा बदल; हिवाळ्यामुळे ट्रस्टचा निर्णय

Ram Mandir New Timings : अयोध्येतील राम मंदिरात १ नोव्हेंबरपासून दर्शनाच्या वेळात मोठा बदल; हिवाळ्यामुळे ट्रस्टचा निर्णय

सकाळी ४ वाजता उघडणार दरवाजे; मंगला आरती व शयन आरतीच्या वेळेतही सुधारणा

Ram Mandir New Timings : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हिवाळा आणि ऋतू बदलाचा विचार करता श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून दैनंदिन पूजा, आरती, भोग, विश्राम आणि दर्शनाच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन वेळ येत्या रविवारी, १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

सध्या राम मंदिराचे दरवाजे सकाळी ०३:४५ वाजता उघडतात आणि रात्री १०:३० वाजता बंद होतात. मात्र, नवीन नियमानुसार आता मंदिराचे दरवाजे सकाळी ०४:०० वाजता उघडतील आणि रात्री १०:०० वाजता पूर्णपणे बंद केले जातील.

पहाटेची आरती आणि दर्शनाची नवीन वेळ

Kohinoor furni.1

मंदिर न्यासाचे मुख्य अर्चक आचार्य केशव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरपासून सकाळी ०४:३० ते ०४:४० या वेळेत मंगला आरती होईल. त्यानंतर ०४:४० ते ०६:३० या वेळेत रामलल्लाचा अभिषेक, श्रृंगार, धूप-दीप आणि नैवेद्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद राहतील. सकाळी ०६:३० वाजता श्रृंगार आरती पार पडल्यानंतर सकाळी ०७:०० वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. सकाळी ०८:०० ते ०८:१० या वेळेत बालभोगासाठी थोडा वेळ दर्शन थांबवले जाईल, त्यानंतर सकाळी ११:३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.

दुपारी विश्राम आणि संध्याकाळचे वेळापत्रक

सकाळी ११:३० ते दुपारी १२:०० या वेळेत राजभोगासाठी दरवाजे बंद राहतील आणि दुपारी १२:०० वाजता राजभोग आरती पार पडेल. दुपारी १२:३० ते ०१:३० या वेळेत रामलल्लाचा विश्राम काळ असेल. त्यानंतर दुपारी ०१:३५ वाजता पुन्हा दर्शन सुरू होऊन ते संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत चालणार आहे.

संध्याकाळी ०४:०० ते ०४:१० बालभोगानंतर ०६:४५ पर्यंत दर्शन सुरू राहील. ०६:४५ ते ०७:०० या वेळेत दरवाजे बंद राहून ०७:०० वाजता संध्या आरती होईल. रात्री ०८:०० ते ०८:३० आणि ०९:१५ ते ०९:३० या वेळेत नैवेद्यासाठी दरवाजे बंद राहतील. अखेर रात्री ०९:३० वाजता शयन आरती झाल्यानंतर रात्री १०:०० वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतील.

जुन्या आणि नवीन वेळेतील तक्ता :

धार्मिक विधी / उपक्रमसध्याची वेळ१ नोव्हेंबरपासून नवीन वेळदरवाजा उघडणेसकाळी ०३:४५सकाळी ०४:००मंगला आरतीसकाळी ०४:००सकाळी ०४:३०श्रृंगार आरतीसकाळी ०६:००सकाळी ०६:३०सकाळचा बालभोगसकाळी ०९:०० – ०९:०५सकाळी ०८:०० – ०८:१०दुपारचा विश्रामदुपारी १२:३० – १२:५५दुपारी १२:३० – ०१:३०शयन आरतीरात्री १०:००रात्री ०९:३०दरवाजा बंद होणेरात्री १०:३०रात्री १०:००