SC Reservation Categorization: अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात चिपळूणमध्ये आरपीआयचे जोरदार आंदोलन

प्रांत कार्यालयावर निदर्शने; प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले) निवेदन


चिपळूण:

SC Reservation Categorization (अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण) करण्याच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिपळूण तालुक्याच्या वतीने प्रांत कार्यालय, चिपळूण येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदन दिल्यानंतर आरपीआय पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शने करत घोषणाबाजी केली. अनुसूचित जाती आरक्षण हे भारतीय संविधानाने दिलेले घटनात्मक संरक्षण आहे. त्यामुळे याचे उपवर्गीकरण करून आरक्षण कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.

या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, कोकण प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. उमेश पवार, युवक जिल्हाध्यक्ष ॲड. प्रषितोष कदम, शहराध्यक्ष मंगेश जाधव आणि शहर सरचिटणीस अमोल कदम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

याशिवाय, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष संजय गमरे, अनंत मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप गमरे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बुद्धघोष गमरे, भीम युवा प्रतिष्ठानचे आकाश कांबळे, संदेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 25-07-2026