North Ratnagiri BJP Meeting: मंडणगडमध्ये उत्तर रत्नागिरी भाजपची बैठक; आगामी संघटनात्मक कार्यक्रमांवर होणार मंथन

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; संघटन अधिक सक्षम करण्यावर भर

मंडणगड:

मंडणगड येथे उत्तर रत्नागिरी भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बैठक ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील भिंगोळी येथील यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण सभागृहात ही बैठक होणार आहे.

या बैठकीस उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बैठकीदरम्यान केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील ‘विश्वास, विकास व जनकल्याण’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आगामी पक्षात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.

पक्ष संघटना बळकट करण्यावर मार्गदर्शन

बैठकीत आगामी काळातील विविध उपक्रमांची रूपरेषा ठरवण्यात येणार असून, भाजप पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम व मजबूत करण्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:11 07-08-2026