Illicit Liquor Seized Lanja: सात लिटर गावठी दारूसह एकावर कारवाई; लांजा पोलिसांची धडक मोहीम

कुणे गुरववाडी परिसरात छापा; लांजा पोलिसांकडून गुन्हा दाखल

लांजा: बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुणे गुरववाडी रस्त्यालगतच्या झाडी परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीर दारू बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

७ लिटर दारू जप्त

त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनिल रामचंद्र गुरव (वय ५७, रा. कुणे गुरववाडी, ता. लांजा) हा विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना गावठी दारू बाळगत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी त्याच्याकडून ७ लिटर गावठी दारू जप्त केली असून, त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:22 07-08-2026