आंबा घाटातील रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

देवरुख : आंबा घाटातील रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. येत्या ८ दिवसात ठोस उपाय न केल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा प्रमुख मनोहर गुरव यांनी दिला आहे.

हा घाट कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महामार्ग असून, या घाटातून असंख्य वाहने दररोज वाहतूक करीत असतात. या रस्त्याचे अनेक ठेकेदार कंपन्या काम करीत असून, संबंधित अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधी, ठेकेदार कंपन्यांचे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. नियमित वाहतूक बंद असल्याने वाहनचालकांचे नुकसान होत आहे.

या मार्गासाठी करोडो रुपये खर्च दाखविण्यात आलेला असून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच वाहने अनधिकृत प्रखर लाईटचा उपयोग करीत असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 07/Nov/2024

Rotery school