Aviraj Gawde Cricket News: रत्नागिरीच्या अविराज गावडेचा इंग्लंडमध्ये ‘हंड्रेड बॉल’मध्ये जलवा; पहिल्याच सामन्यात सामनावीर

‘चेरा कप’ स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी; ३५ चेंडूंत ४८ धावा अन् १६ धावांत ३ बळी

Aviraj Gawde Cricket News बाबत मिळालेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीची छाप उमटवणाऱ्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने आता ‘हंड्रेड बॉल’ क्रिकेट फॉरमॅटमध्येही चमकदार कामगिरी करत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

भारतातील आयपीएल (IPL) प्रमाणेच इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘द हंड्रेड’ या क्रिकेट फॉरमॅटच्या धर्तीवर ब्रिटिश तमिळ क्रिकेट लीगतर्फे ‘चेरा कप’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अविराजने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट प्रदर्शन करत ‘सामनावीर’ (Man of the Match) पुरस्कार पटकावला.

Aviraj Gawde Cricket News: ‘वाल्वयी ब्लू’ संघाकडून धडाकेबाज कामगिरी
अविराजने ‘वाल्वयी ब्लू’ संघाचे प्रतिनिधित्व करताना फलंदाजीत आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ४८ धावा कुटल्या. या फॉरमॅटमध्ये प्रत्येक षटक (Over) हे ५ चेंडूंचे असते आणि एकूण १०० चेंडूंची एक इनिंग असते. अविराजच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ‘वाल्वयी ब्लू’ संघाने १४७ धावांची मजल मारली.

यानंतर गोलंदाजीतही अविराजने आपली छाप पाडली. त्याने २० चेंडूंमध्ये ०.८० च्या इकॉनॉमी सरासरीने अवघ्या १६ धावा देत तब्बल ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर ‘वाल्वयी ब्लू’ संघाने दणदणीत विजय मिळवला.

Tata motars tiago

पहिल्याच सामन्यात ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी आणि ३ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल अविराज गावडेचे रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींकडून भरभरून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 11-08-2026