हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी तरुणावर कारवाई
रत्नागिरी: हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील जकात नाका फाटा येथे भरधाव आणि बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी एका २६ वर्षीय कारचालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
कांचन हॉटेल ते रत्नागिरी मार्गावर बेदरकारपणे चालवली कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विधीन विलास कांबळे (वय २६, रा. आदर्शनगर, पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित कांबळे हा आपली क्रेटा कार (क्रमांक MH 08 बी६६५) घेऊन कांचन हॉटेल ते रत्नागिरीच्या दिशेने महामार्गावरून जात होता. जकात नाका फाटा येथे आल्यानंतर त्याने वाहन अतिशय बेदरकारपणे चालवल्याचे निदर्शनास आले.
भारतीय न्याय संहिता अन् मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 18-08-2026














